माहितीचा अधिकार (RTI) – ग्रामपंचायत लखाड

माहितीचा अधिकार (RTI)

ग्रामपंचायत लखाड
ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती – ४४४७०५

“पारदर्शी, गतिमान आणि उत्तरदायी प्रशासन”

Public Information Officer

[श्री. ग्रामसेवकाचे नाव]

जनमाहिती अधिकारी तथा
ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक

पत्ता: ग्रामपंचायत कार्यालय, लखाड, ता. अंजनगाव सुर्जी.

संपर्क: [99XXXXXX00]

कार्यक्षेत्र: लखाड गाव महसूल हद्द

Appellate Authority

मा. गटविकास अधिकारी सो.

प्रथम अपिलीय अधिकारी

पत्ता: पंचायत समिती कार्यालय, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती.

संपर्क: 07224-XXXXXX

ईमेल: bdo.anjangaon@mahapanchayat.gov.in

ℹ️ माहितीचा अधिकार अधिनियम २००५

लखाड गावातील प्रत्येक नागरिकाला प्रशासकीय कामकाजाची माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

  • उद्देश: प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाचार रोखणे.
  • कालावधी: अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक.
  • तातडीची माहिती: जर माहिती ‘जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी’ संबंधित असेल तर ४८ तासात दिली जाईल.

📝 अर्ज करण्याची प्रक्रिया (लखाड ग्रामपंचायत)

  1. कोऱ्या कागदावर किंवा ‘नमुना अ’ मध्ये जनमाहिती अधिकारी यांच्या नावाने अर्ज करावा.
  2. अर्जाचा विषय आणि हवी असलेली माहिती स्पष्ट शब्दात लिहावी.
  3. अर्जासोबत रु. १०/- (कोर्ट फी स्टॅम्प किंवा रोख पावती) जोडावी.
  4. BPL धारकांसाठी: दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका (रेशन कार्ड) झेरॉक्स जोडल्यास शुल्क माफ आहे.
  5. अर्ज ग्रामपंचायत कार्यालय, लखाड येथे जमा करून त्याची पोहोच (Acknowledgement) घ्यावी.

📊 लखाड ग्रामपंचायत – RTI अहवाल (२०२४-२५)

वर्ष एकूण प्राप्त अर्ज निकाली काढलेले नाकारलेले प्रलंबित
२०२४-२५ १२ १२ ०० ००
२०२३-२४ ०८ ०८ ०० ००
Scroll to Top